Sunday, March 22, 2009

धुडगूसः मराठी चित्रपट

चित्रपटः धुडगूस
निर्माता: सतिश मोरे, स्नेहा तांबे
दिग्दर्शकः राजेश देशपांडे
कलाकारः शांता तांबे, निर्मिती सावंत, रविंद्र बेर्डे, सुहास पळशीकर, शरद पोंक्षे.
पाहुणे कलाकारः भरत जाधव, संजय नार्वेकर

कथा: गावच्या एका अल्लड मुलीचे [सुरेखा] लग्न एका सैन्यातील मुलाशी [महादजी] होते. लग्नाच्या दुस-याच दिवशी तिच्या पतिला तातडीने परत बोलावणे येते. घरच्या गडबडीत त्या बिचारीचे नव-याबरोबर दोन शब्द बोलणे देखील होत नाही आणि तो सैन्यात परत जातो. काही दिवसातच तिच्या नव-याची शहिद झाल्याची बातमी येते आणि चित्रपटाच्या मुख्य कथानकाला सुरुवात होते. आमदार साहेव शहित महादजीच्या नावाने २५ लाख व काही एकर जमिन जाहिर करतात आणि मग सासर आणि माहेरच्या लोक या पैशासाठी कसे माणुसकी, नाती विसरतात याची ही कथा.

नात्यांची गळचेपी व गावचे राजकारण यांच्या खास मांडणीने चित्रपट खास बनलाय.

0 comments:

Post a Comment