Monday, March 2, 2009

गोंद्या मारतय तंगडं - मराठी चित्रपट - २००८

निर्माता: सुशिलकुमार अग्रवाल
दिग्दर्शकः पितांबर काळे
कलाकारः भरत जाधव, रमेश भाटकर, मधु कांबीकर, जयराज नायक, निशा परुळेकर, प्रज्ञा जाधव

कथा: गोंद्या मारतय.... ही गोंद्या [भरत जाधव] या एका गोंधळलेल्या बिचा-याची कथा आहे. कुणीही काहीही काम सांगावं आणि गोंद्याने ते करावं असा हा हरकाम्या. धांदरटपणामुळे कोणतेच काम व्यवस्थित न करणारा व त्यामुळे त्याची आई त्याला स्मशानभुमीत - सरपण - जळाऊ लाकडांची - रात्रीची राखणदारी करण्याची नोकरी लाऊन देते.

पहिल्या तीन रात्री त्याला तीन भुतं भेटतात जी मुक्त होण्यासाठी भटकत असतात. त्यां प्रत्येकाची एक कहाणी असते आणि ते गोंद्याच्या मार्फत आपापली मुक्ती कशी मिळवतात त्याची ही कथा.

0 comments:

Post a Comment